बापरे...! अजगराने गिळली अख्यी निलगाय..! बघा फोटो...!

12 फूट लांब अजगरानं नीलगायीचं वासरू एका फटक्यात गिळल्याचं समोर आलं आहे. ऊसाच्या शेतात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मालीपुरा गावात हा प्रकार समोर आला आहे. शेताच्या मधोमध नीलगायीच्या वासराची शिकार करताना शेतकऱ्याच्या मुलीनं पाहिलं.


या तरुणीनं गावातील नागरिकांना माहिती देईपर्यंत या अजगरानं वासराला संपूर्ण गिळंकृत केलं होतं.


याची माहिती वन विभागाला देऊनही त्यांची टीम घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला.


संतापलेल्या स्थानिकांनी पोलिसांच्या डोळ्यादेखत या अजगराची शेपटी धरून त्याला ओढत शेताबाहेर आणलं. यामध्ये अजगराचा मृत्यू झाला आणि स्थानिकांनी एक खड्डा खोदून त्यामध्ये अजगराला त्यामध्ये पुरलं.


शनिवारी दुपारी शेतकरी देवदत्ता खडगवंशी यांच्या दोन मुली शेतात गेल्या होत्या. तिथे त्यांनी अजगराला गायीची शिकार करताना पाहिलं. त्यातली एकजण अजगराला पाहून बेशुद्ध पडली तर दुसरीनं गावात जाऊन सगळ्यांना याची माहिती दिली.


स्थानिकही या अजगराला पाहून हैराण झाले. या अजगराला स्थानिकांनी शेपटी पकडून घसरत जंगलाच्या दिशेनं घेऊन जाताना अजगराचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments