गोंडपिपरी ग्रामिण रुग्णालयाला दिली सॅनिटायझर मशिनकार्यकर्त्यांच्या विनंतीवरुण आ.सुधिर मुनगंटिवारांची भेट

गोंडपिपरी

रुग्णालयात सॅनिटायझर मशिन नाही.यातच तालुक्यात संख्या वाढत आहे.ही बाब हेरुण रुग्णालयाला सॅनिटायझर मशिन देण्याची विनंती स्थानिक कार्यकर्त्यानी आ.सुधिर मुनंगटीवार यांना केली.घंट्याभरात मुनगंटीवारांनी मागणी पुर्ण केली.अन रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

तालुक्याचा विस्तार मोठा आहे.गोंडपिपरी तालुक्यात आरोग्याच्या सोई देखिल तोडक्या आहेत.यातच तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या ग्रामिण रुग्णालयात आजूबाजूंच्या खेड्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात.अश्यातच गोंडपिपरी तालुक्यातील  कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता भाजपचे कार्यकर्ते प्रशांत येल्लेवार यांनी आ.सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे सॅनिटायझर मशीनची मागणी केली.लागलिच मुनगंटीवारांनी यांनी काही तासातच सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिली.बुधवारी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.स्थानिक गोंडपिपरी येथील शेतकरी,जेष्ठ नागरिक आत्माराम पुडके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी गोंडपिपरीचे माजी नगराध्यक्ष संजय झाडे,चेतन गौर,मनीष वासमवार,गणपती चौधरी,बालू दिनगलवार,गणेश मेरुगवार,नाना नागपुरे आदिंची उपस्थित होती.सॕनिटायजर मशिनच्या भेटीने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments