50 खाटांचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर राजूर्यात सुरू;आमदार धोटे यांच्या हस्ते उद्घाटन ; तालुक्यातील रूग्णांना मिळणार लाभ



राजुरा ( चंद्रपूर )

राजुरा तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे .आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज (शुक्रवार ) रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. 50 खाटा असलेल्या या सेंटरचा लाभ कोविड रूग्णांना होणार आहे.

 कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण वाढलेला आहे. कोविड उपचारासाठी प्रत्येक रुग्णांना चंद्रपूर येथे रेफर केल्या जाते. त्यामुळे राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती.नागरिकांच्या मागणीची दखल घेत  आमदार सुभाष धोटे यांनी  डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर राजूरा येथे स्थापण करण्यासाठी पाठपुरावा केला. पाठपुराव्याला यश आले असून आज ( शुक्रवारला ) उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून पन्नास खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत आलेल्या रुग्णांवर या  सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुडमेथे ,डॉक्टर बांबोळे, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर अमित चिद्धमवार, डॉक्टर डाखोळे,  डॉक्टर अनिता आरके, डॉक्टर शेख ,डॉक्टर स्नेहल डाहूले, डेडिकेट कोवीड हेल्थ केअर सेंटर प्रमुख डॉक्टर विवेक लांजेकर, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments