दारु साठ्यासह चार लाख ऐकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त :गोंडपिपरी पोलीसांची कार्यवाही

Crime,Alcoholsmuggling,polis,chandrapur,gondpipri


गोंडपिपरी ( चंद्रपूर )

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथून येनबोथलाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन चारचाकी वाहनाने दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. येनबोथला मार्गावर पोलीसांनी पाळत ठेवली. या मार्गाने जाणाऱ्या पीकअप व स्कारपिओ वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या आत दोन प्लास्टीकच्या ड्रममध्ये दहा पेठ्या देशी दारु  मोठ्या प्रमाणात आढळली.दारूसह चार लाख ऐकाहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल गोंडपिपरी पोलीसांनी जप्त केला.

गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात चोर मार्गाने दारूची तस्करी सूरू आहे.अश्यात तालुक्यातील विठ्ठलवाडा मार्गे येनबोथला गावाकडे दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहीती गोंडपिपरी पोलीसांना मिळाली.  माहीतीचा आधारे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात काही पोलीस कर्मचार्यांनी येनबोथला मार्गावर बुधवारला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गस्त घातली. यावेळी विठ्ठलवाडा मार्गे  स्कारपिओ गाडी ( क्र. एम.एच.39 1029 ) व  टाटा एस ( क्र एम. एच. 34 एबी.1834 ) अशी दोन वाहने येतांना दिसली.या  वाहनाची झडती घेतली असता वाहनाचा आत ठेवलेल्या प्लास्टिक ड्रम मध्ये १० पेट्या देशी दारूच्या आढळून आल्या. वाहनातील चार व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.  गणेश मनोहर देठे ,रविंद्र सुरेश येरेकर,स्वप्नील घनश्याम वावरे ,अक्षय हीरामण लोखंडे अशी ताब्यात असलेल्या व्यक्तींची नावे आहेत.पुढील तपास ठाणेदार धोबे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments