चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दूर्मिळ अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा ; सर्पमित्रांनी दिले जिवनदान



राजुरा ( चंद्रपूर )

 राजुरा  तालुक्यातील चंदनवाही येथे दूर्मिळ अल्बिनो स्पेक कोब्रा जातीचा साप आढळून आला.अनुवांशिक आजारामुळे या सापाचा रंग पिवळसर असतो.जिवनदीप सर्पमित्र बहुउद्देशिय संस्थेतील सर्पमित्रांनी या सापाला पकडले. वनविभागात नोंदणी करून या सापाला वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.चंदनवाही येथिल मडावी यांच्या घरी साप आढळून आला. त्यांनी जिवनदिप सर्पमित्र बहुउद्देशिय संस्था राजूरा येथिल सर्पमित्रांशी संपर्क साधला. संस्थेचा सर्पमित्रांनी साप पकडण्यासाठी चंदनवाही गाठली.आढळून आलेला साप त्यांना वैशिष्ट्यपूर्ण वाटला.
त्या सापाचे निरिक्षण केले असता अतिदूर्मिळ असलेला अल्बिनो स्पेक कोब्रा निघाला.कोब्रा जातीतील हा साप अतिशय दुर्मिळ आहे. अनुवांशिक आजाराच्या प्रकारामुळे या सापाचा रंग पिवळसर असतो. शिवाय डोळे गुलाबी असतात. त्वचेतील मेलानिनचे प्रमाण कमी असल्यामुळे या सापाला उष्णता सहन होत नाही. शिवाय उन्हामुळे दृष्टीही कमजोर होत असल्याची माहिती सर्पमित्र प्रवीण लांडे यांनी दिली. अश्या प्रकारचे साप फार कमी प्रमाणामध्ये आढळतात. अनुवांशिक आजारातून अशा प्रकारचे साप जन्माला येतात. साधारण तीन फूट लांब असलेल्या या सापाला वन विभागामध्ये नोंदणी केल्यानंतर सर्पमित्रानी जंगलात  सुखरूप सोडले. यावेळी जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लांडे, प्रविण लांडे,अमर पाचारे,संदीप आदे,शेखर खोके,प्रविण दुरबडे,सत्यपाल मडावी, गणपत मडावी ,स्वप्नील बुट्टे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments