माजी आमदार पोहचले बांद्यावर ; खचलेल्या शेतकऱ्यांना दिला धिर; नुकसानभरपाई देण्याची केली मागणी
राजुरा  ( चंद्रपूर )

मागील दोन दिवसात झालेल्या परतीचा पावसाने राजुरा क्षेत्रातील खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान केले .हातात आलेले कापूस ,सोयाबीन व धानाचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माजी आमदार सूदर्शन निमकर यांनी केली. शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी निमकरांनी केली आहे.

  राजुरा तालुक्याला परतीचा पावसाने झोळपून काढले. राजूरा तालुक्यात कापूस , सोयाबीन धान , मिरचीचे पीक घेतले जाते. सोयाबीन व कापसाचा पिक शेवटच्या टप्यात आहे.अश्यात दोन दिवसात झालेल्या वादळी पावसाने उभी पिके जमिनीवर लोळली. अति पावसामुळे सोयाबिन पिकांचे नुकसान झाले आहे.तोडलेल्या सोयाबिनला अंकूर फुटले आहे तर कापूस काळवंडलेले आहे. धानाचे पीक जमिनीवर लोडल्याने त्याचा विपरित परिणाम उत्पनावर होणार आहे. हातात येणारे पीक नष्ट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी माजी आमदार सूदर्शन निमकर शेतीचा बांद्यावर पोहचले.शेतपिकांची पाहणी केली.शेतकऱ्यांना धिर दिला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील परतीचा पावसामुळे झालेल्या शेतपिकांची त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निमकरांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments