कोरोना आजारातून बरा झालेला " अशोक " आता करतो जनजागृतीराजूरा ( चंद्रपूर )

" त्याने " कोविडची तपासणी केली. तो कोरोना बाधित निघाला.गृह अलगिकरणात राहून त्याने उपचार केला.सतरा दिवसांनी तो बरा झाला. कोरोना बाबत समाजात टोकोचे गैरसमज पसरले होते.तपासणीसाठी लोकं प्रतिसाद देईना.अश्यात तो पुढे आला.त्याने स्वताचे अनुभव सांगितले.लोकांना तपासणी करण्यासाठी प्रवृत्त केले.टाळेबंदीत केलेल्या कार्याची महसूल प्रशासनाने  दखल घेत त्याचा गौरव केला होता.कोविडचा जनजागृतीसाठी स्वताला झोकून देणाऱ्या त्या तरूणाचे नाव आहे अशोक राव.  राजूरा शहारातील रहीवाशी आहे.

कोविड मुक्त महाराष्ट्र अभियाना अंतर्गत प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत सर्वेक्षणातून प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची माहिती गोळा केली जात आहे .यासाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. मात्र काही ठिकाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये नागरिकांची असहकार्याची भूमिका आहे. कोरोणा बाबत समाजात टोकाचे गैरसमज पसरले असल्याचे समोर आल्यानंतर तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत कोरोना आजारातून नुकतेच बरे झालेले राजुरा येथिल सामाजिक कार्यकर्ते अशोक राव पुढे आलेत.  स्वतःला कोविडमुक्त अभियानामध्ये अशोकने झोकून दिले आहे. प्रत्येक कुटुंबीयांना ते आपले अनुभव शेअर करीत तपासणीसाठी त्यांना प्रवृत्त करीत आहेत. कोरोणा पासून बचाव करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राजुरा नगर परिषद अंतर्गत रमाबाई व सोनिया नगर वार्ड मध्ये अशोकने जनजागृती केली. नागरिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.टाळेबंदीमध्ये अडकलेल्या सर्वसामान्यासाठी अशोक राव धावून गेला होता.मजूर,गरीबांना त्याने मदतीचा हात दिला होता. त्यांचा या कार्याची दखल महसूल विभागने दखल घेतली.प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविले आहे.अशोक रावांची कोविड जनजागृती अनेकांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments