कुडेसावली येथे वाघाचे हल्ल्यात बैल ठार,,शेतकरी धास्तावले

गोंडपिपरी

गोंडपीपरी तालुक्यातील कुडेसावली येथील रामचंद्र मोरे यांचे मालकीचे शेतात बैलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज पाच वाजेच्या सुमारास घडली यामुळे ऐन शेती हंगामात बैल वाघाचे हल्ल्यात ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे माहिती मिळताच मध्य चांदा। वन विभागाचे कोठारी येथील वन क्षेत्रपाल संदीप लंगडे,वनरक्षक श्याम यादव,आणि इतर वन कर्मचारी घटना स्थळी पोहचून पंचनामा केला झालेल्या नुकसानी बद्दल वन विभागाकडून योग्य मदत दिली जाणार असल्याचे वन अधीकार्यानी  सांगितले
     मागील काही महिन्यापासून या भागात वाघाची दहशत असल्याने शेतकरी लवकरच शेतातून घराकडे परत येत आहेत वन कर्मचारी गस्त करीत आहेत तरीपण वाघ शेत शिवारात येऊन मिळेल त्याची शिकार करीत असल्याने भीतीचे वातावरण झाले आहे

Post a Comment

0 Comments